Loading
Somy Ali Post For Salim Khan; 'मला मुलीसारखं वागवलं, त्यांचं माझ्या आयुष्यातील महत्त्व...' सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची सलीम खान यांच्यासाठी भावूक पोस्ट
Salman Khan Ex Girlfriend Somy Ali Shares Emotional Post For Salim Khan
Somy Ali : 'मला मुलीसारखं वागवलं, त्यांचं माझ्या आयुष्यातील महत्त्व...' सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची सलीम खान यांच्यासाठी भावूक पोस्ट
Salman Khan Ex- Girlfriend On Salim Khan : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने सलीम खान यांच्यासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.
सुप्रसिद्ध लेखक सलीम खान यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. सलीम यांना रुग्णालयात दाखल करताच संपूर्ण खान कुटुंबीय रुग्णालयात पोहोचलं. अशातच आता सलमान खान यांची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सलीम खान लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.
Samir Choughule : समीर चौघुले यांच्या शिरपेचात मानाचा तुरा, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना; प्राजक्ता माळीनंही केलं कौतुक
यांचा दोन्ही पत्नींसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, 'सलीम खान यांना रुग्णालयात दाखल केलंय, हे ऐकून माझं मन दुःखी झालंय. जगासाठी ते एक महान लेखक आहेत, ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महानायकांना घडवलं आणि ‘शोले’सारख्या अजरामर कलाकृती निर्माण केल्या. पण माझ्यासाठी ते वडिलांसारखे आहेत.'
सलीम खान यांना ब्रेन हॅमरेज, उपचारांबाबत डॉक्टरांनी सविस्तर सांगितलं
'त्यांच्या घरात राहत असताना त्यांनी मला मुलीसारखं वागवलं. मला जेवणाच्या टेबलावर एकत्र बसवायचे. माझ्यासोबत बोलायचे. त्यांच्या घरात सर्व धर्मांचा आदर व्हायचा आणि सगळे सण साजरे केले जायचे. देव हा सर्वात मोठा असतो आणि एखादी गोष्ट सांगताना त्यात नाट्याबरोबरच सत्यसुद्धा असलं पाहिजे, हे त्यांनी मला शिकवलं. त्यांच्या बुद्धिमत्तेनं
इतिहास घडवला, पण त्यांच्या माणुसकीनं माणसं घडवली. ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतेय, त्यांचं माझ्या आयुष्यातील महत्त्व मला शब्दांत व्यक्त करता येणार नाही.' असं सोमी अलीने पुढे म्हटलं आहे.
देत डॉ. जलील पारकर म्हणाले की, 'काल सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचे फॅमिली डॉक्टर संजीव चोप्रा त्यांना घेऊन आले. आम्ही सुरुवातीला त्यांच्यावर इमर्जन्सीमध्ये उपचार केले. त्यांना झटके येत होते. त्यांचं बीपी जास्त होतं. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं. त्यांची प्रकृती आणखी बिघडू नये अशी आमची इच्छा होती. आम्हाला काही टेस्ट कराव्या लागल्या. न्यूरोलॉजिस्ट त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांना आता आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.'
"तेजश्री राजेंद्र कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये एक वर्षांपासून 'कन्सल्टन्ट' या पदावर कार्यरत. चालू घडामोडींसोबतच मनोरंजन, फॅशन, क्राईम, अशा वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड. वझे केळकर महाविद्यालयातून मराठी साहित्यात पदवी आणि CHM महाविद्यालयातून मराठी साहित्याचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. "
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Samir Choughule : समीर चौघुले यांच्या शिरपेचात मानाचा तुरा, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना; प्राजक्ता माळीनंही केलं कौतुक
The Kerala Story 2: 'पुढील २५ वर्षांत भारत एक इस्लामिक राष्ट्र होईल आणि..', द केरला स्टोरी २चा ट्रेलर रिलीज, नितेश राणेंचं ट्विट व्हायरल
Astad Kale:'आणि ही आपली लायकी आहे....', नोटबंदीत रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांची मनोज तिवारींकडून खिल्ली? व्हिडिओ पाहून आस्ताद काळेचा संताप
Kiara Advani च्या सासऱ्यांचे निधन, भावुक पोस्टमधून शेअर केल्या सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांसोबतच्या गोड आठवणी
Mithun Chakraborty यांच्या पहिल्या पत्नीला 2 दीर झालेले डोईजड, घरातून हाकलायची नवऱ्याकडे मागणी, मनासारखं न झाल्याने 4 महिन्यात घटस्फोट
Viju Mane: माने IIT यन झाले! वयाच्या ४६व्या वर्षी दिग्दर्शत विजू माने दिल्ली आयआयटीत, या कोर्ससाठी घेतलाय प्रवेश
Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :