Loading
Sikander Shaikh Exclusive : मोठ्या मनाचा सिकंदर! माऊली कोकाटेने आधी हात उचलला? सिकंदर शेखची हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Pune Sikander Sheikh Reaction To The Controversy With Mauli Kokate Mulshi Puad Kusti 2026
Sikander Shaikh Exclusive : मोठ्या मनाचा सिकंदर! माऊली कोकाटेने आधी हात उचलला? सिकंदर शेखची हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Sikander Shaikh News : संपर्ण देशात प्रसिद्ध असलेला नामवंत मल्ल सिकंदर शेख चर्चेत आला आहे. पुण्यात माऊली कोकाटेसोबतच्या कुस्तीमध्ये सिकंदरवर एका बाहेरच्याने हात उचलला होता. या वादाची राज्यभर चर्चा होत आहे. अशातच या वादावर सिकंदरनने महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील मुळशी येथील पौड गावामध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त झालेल्या कुस्ती सामन्यात नामवंत मल्ल सिकंदर शेख याच्यासोबत चुकीचं कृत्य घडलं. सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्या कुस्ती दरम्यान झालेल्या वादात कोकाटेच्या एका समर्थकाने सिकंदरवर हात उचलला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. सिकंदरसारख्या मोठ्या मल्लावर झालेल्या या हल्ल्याची सर्व राज्यात चर्चा होत आहे. या सर्व वादावर सिकंदर शेखने महाराष्ट्र टाइम्स आनलाइनसोबत बोलताना पहिली दिली आहे.
मुळशी तालुक्यात पौड येथे 17 फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सवानिमित्त मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धा भरवण्यात आली होती. या आखाड्यात सर्वांचं सर्वांचं लक्ष अकरा लाखांच्या कुस्तीवर होतं. महाराष्ट्र केसरी
विरुद्ध माऊली कोकाटे यांच्यात लढत होणार होती. जवळपास दीड तास ही कुस्ती चालली होती, या कुस्ती दरम्यान माऊली कोकाटेने सिकंदरच्या कानावर मारायला सुरुवात केली. सिकंदरने माऊलीला ताकीदही दिली, परंतु तो काही थांबला नाही शेवटी सिकंदरही त्याला भेटला यादरम्यान मोठा गोंधळ उडाला. त्यावेळी तिथे असलेला माऊली कोकाटेचा समर्थक आखाड्यात शिरला आणि त्याने थेट सिकंदरवर हात उचलला. हा वाद मिटवला गेला पुन्हा कुस्ती लावण्यात आली पण शेवटी निकाल काही लागलाच नाही. 11 लाख बक्षीस ठेवलेल्या आयोजकांनी दोघांनाही विजयी घोषित केले. या वादावर सिकंदर शेखने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Sikander Shaikh : पुण्यात कुस्तीला गालबोट, मुळशीत भर आखाड्यात सिकंदरवर उचलला हात, ११ लाखांच्या बक्षिसाचं काय झालं?
आमच्यात जे झालं ते गरमा गरमीत झालं. दोघांचीही बॉडी गरम होती, मला काही कोणालाही बदनाम करायचं नाही. माऊली कोकाटेचा कोणतरी पार्टनर होता तो अंगावर जाऊन आला, त्याची मला फाईट बसली. तो जो कोण होता तो कोकाटे सोबत असतो. बाहेरचा आत मध्ये येऊन मारणे चुकीच असल्याचं सिकंदर शेखने म्हटलं आहे.
दरम्यान, सिकंदर शेखने हे प्रकरण काही वाढवलं नाही, मोठ्या मनाने माऊली कोकाटेचा एक मल्ल म्हणून सन्मान ठेवला, हा वाद मिटवता घेतला. पण त्याच्यावर झालेला हल्ला हा चुकीचाच होता. मात्र आयोजकांनी सुद्धा याची खबरदारी घ्यायला हवी. कारण देशातील एखादा मोठा मल्ल आपल्या येथे कुस्ती खेळण्यासाठी येत असेल आणि त्याच्यावर असा हल्ला होत असेल तर चिंतेची बाब आहे.
हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Sikander Shaikh : पुण्यात कुस्तीला गालबोट, मुळशीत भर आखाड्यात सिकंदरवर उचलला हात, ११ लाखांच्या बक्षिसाचं काय झालं?
Pakistan Team: भांडी घासावी लागली, हॉटेलबाहेर 14 तास ताटकळत उभं राहवं लागलं, पाकिस्तानी कर्णधाराचे गंभीर आरोप
PT Usha Husband Death : पी.टी उषा यांच्यावर दु:खाचा डोंगर, पती व्ही. श्रीनिवासन यांचं निधन, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
Ajit Pawar: अजित पवारांसारखा दुसरा कोणी होऊच शकत नाही, महाराष्ट्राच्या कबड्डीत न घडलेली कोणती गोष्ट करून दाखवली, जाणून घ्या..
Ajit Pawar: 'त्यांनी माझ्याकडे पाहून हात जोडले, म्हणाले ताई तुम्हाला...शकुंतला खटावकर यांनी सांगितली अजितदादांची अविस्मरणीय आठवण..
Ajit Pawar: अजित पवारांचं त्यावेळी ऐकलं असतं तर.. फुलराणी सिंधूला दादांच्या निधनानंतर होतोय पश्चाताप, अखेर ती गोष्ट सांगितली...
Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :