Loading
Ranji Trophy Final 2026 : रणजी फायनलच्या पहिल्याच दिवशी वाद, कॅप्टनने थेट खेळाडूच्या अंगावर जात मारली ढुशी, Video समोर
Ranji Trophy Final 2026 Captain Paras Dogra Headbutt Substitute Fielde Aneesh Incident
Ranji Trophy Final 2026 : रणजी फायनलच्या पहिल्याच दिवशी वाद, कॅप्टनने थेट खेळाडूच्या अंगावर जात मारली ढुशी, Video समोर
Ranji Trophy Final 2026 : पहिल्यांदाच रणजी फायनलमध्ये गेलेल्या जम्मू काश्मीर संघाचा कर्नाटकसोबत सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये मोठा वाद पाहायला मिळाला. कॅप्टन आणि कर्नाटकचा बदली खेळाडू अनीशसोबत वाद घातला.
कर्णधार पारस डोगरा (७० धावा) याने बुधवारी अर्धशतकी खेळी केली खरी; पण कर्नाटकचा बदली खेळाडू के. व्ही अनीश याला जाणूनबुजून दुशी दिल्यामुळे (हेड-बट) दमदार जम्मू-काश्मीरच्या फलंदाजीला गालबोट लागले. जम्मू-काश्मीरने कर्नाटकविरुद्धच्या रणजी करंडक अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेरीस सहा बाद ५२७ धावा केल्या आहेत.
डोगरासह यष्टीरक्षक-फलंदाज कन्हैया वाधवान (७०), साहिल लोत्रा (नाबाद ५७ धावा) यांनीही भरीव योगदान दिल्याने
लंदाजांचा घाम निघाला होता. फक्त प्रसिध कृष्णा (२९ षटकांत ९० धावांत तीन विकेट) हाच प्रभावी ठरला. मात्र, २१ रणजी मोसमांचा दांडगा अनुभव असणाऱ्या पारस डोगरा याच्या वर्तनाने साऱ्यांनाच चकित केले. प्रसिधच्या चेंडूवर एक चौकार लगावल्यानंतर त्याने 'सिली पॉइंट' वरील
IND vs ZIM T20 Playing 11 : भारतीय संघातून झिम्बाब्वेविरूद्ध दोघांचा पत्ता होणार कट, प्लेइंग 11 मध्ये दोघांची एन्ट्री फिक्स, पाहा कोण
अनीशच्या कोणत्या टोमण्यामुळे डोगरा संतापला हे स्पष्ट झाले नाही. - डोगराने आधी अनीशशी वाद घातला आणि नंतर त्याच्या हेल्मेटला डोक्याने टक्कर दिला. यानंतर कर्नाटकचा वरिष्ठ खेळाडू मयंक अगरवाल याने मध्यस्थी करत डोगराला थांबवले. अगरवाल-डोगरा यांच्यातील संवादानंतर मैदानातील पंच रोहन पंडित आणि उल्हास गंधे यांनीही मध्यस्थी केली. काही वेळानंतर कर्नाटकचा कर्णधार देवदत्त पडिक्कल यानेही पंचांकडे दाद मागत डोगराची तक्रार केली.
T20 World Cup WI vs SA : वर्ल्ड कपमधील दुसरा सेमी फानयल संघ ठरणार, भारतासाठी कोणाचा विजय महत्त्वाचा? दक्षिण आफ्रिका हरली तर एकच नंबर, पण...
संबंधित प्रकाराबद्दल दंड म्हणून डोगरा याच्या सामन्याच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापून घेण्यात येऊ शकते. भारतीय क्रिकेट बोडांचे (बीसीसीआय) सामनाधिकारी नारायणन कुट्टी यांच्याकडून दंडाची अधिकृत घोषणा सामना संपल्यानंतरच होईल.
Rinku Singh वर्ल्ड कपमधील उर्विरत मॅच खेळणार की नाही? झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यापूर्वी कोचकडून मोठी अपडेट
जम्मू काश्मीरची पहिल्या दोन दिवसांतील फलंदाजी पाहून १९८१-८२च्या दिल्ली-कर्नाटक सामन्याची आठवण होत आहे. त्या सामन्यात कर्नाटकने रॉजर बिन्नी, ब्रिजेश पटेल, सईद किरमाणी, रणजीत खानविलकर यांच्या शतकामुळे ७०५ धावा केल्या होत्या. गुरशरण सिंग, मोहिंदर अमरनाथ यांचे शतक तसेच राजेश शुक्ला आणि राजेश पीटर यांनी नवव्या विकेटसाठी केलेल्या ११८ धावांच्या नाबाद भागीदारीमुळे दिल्लीने सहाव्या दिवशी पहिल्या डावात निर्णायक आघाडी घेत विजेतेपद जिंकले होते.
IND vs ZIM : टीमला मोठा धक्का, रिंकू सिंग अचानक घरी परतल्याने प्लेइंग 11 मध्ये मॅचविनरची एन्ट्री फिक्स, नेमका कोण?
'...ती काय फार मोठ्ठी गोष्ट नव्हे', ही आहे पारस डोगरा याची प्रतिक्रिया. 'आमची टीम सध्या खूप चांगल्या स्थितीत असून तेच फार महत्त्वाचे आहे. फायनल किंवा अशा मोठ्या सामन्यात असे प्रसंग होत राहतात. क्षणिक आवेशात ते घडले. आता सर्व काही ठीक असून आम्ही नंतर बोलणेही सुरू केले होते', असे पारस म्हणाला. जम्मू काश्मीर संघ पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर फायनलचा निकाल आपल्या बाजूने करण्यासाठी शक्य तितका जास्त वेळ फलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पारसने सांगितले.
हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Sabba Manzer : अशाने तुम्हाला वर्ल्डकप मिळायचा नाही, पाक कर्णधार सलमान आगाची बायको चिडली, पाकिस्तानींना चांगलंच सुनावलं
IND vs ZIM T20 Playing 11 : भारतीय संघातून झिम्बाब्वेविरूद्ध दोघांचा पत्ता होणार कट, प्लेइंग 11 मध्ये दोघांची एन्ट्री फिक्स, पाहा कोण
T20 World Cup WI vs SA : वर्ल्ड कपमधील दुसरा सेमी फानयल संघ ठरणार, भारतासाठी कोणाचा विजय महत्त्वाचा? दक्षिण आफ्रिका हरली तर एकच नंबर, पण...
IND vs ZIM : टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरूद्ध मास्टरप्लॅन, कोच गंभीरचा निर्णय, प्लेइंग 11 मध्ये कॅप्टन सूर्याची बदलली जागा
Arjun Tendulkar Saaniya Chandhok: प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी जामनगरला पोहोचले अर्जुन-सानिया; तेंडुलकर कुटुंबाच्या आनंदात अंबानीही सामील
NZ vs SL: न्यूझीलंडचा दणदणीत विजय; वर्ल्ड कपमधून श्रीलंकाचा पॅकअप; आता पाकिस्तानचं काय?
Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :