Mar, 13 2026

PAK vs ENG : 'मॅचदिवशी सकाळी मला...'; पाकिस्तानला लोळवणाऱ्या शतकवीर हॅरी ब्रूकचा मोठा खुलासा, सेंच्युरीमागचा खरा मास्टरमाईंड वेगळाच


Image Source By : Digital Satta

PAK vs ENG : 'सामन्याच्या दिवशी सकाळी मला...'; पाकिस्तानला लोळवणाऱ्या शतकवीर हॅरी ब्रूकचा मोठा खुलासा, सेंच्युरीमागचा खरा मास्टरमाईंड वेगळाच


T20 International Cup 2026 Pak Vs Eng Harry Brook Big Statement After Defeat Pakistan

PAK vs ENG : 'मॅचदिवशी सकाळी मला...'; पाकिस्तानला लोळवणाऱ्या शतकवीर हॅरी ब्रूकचा मोठा खुलासा, सेंच्युरीमागचा खरा मास्टरमाईंड वेगळाच

Harry Brook Hundred News : पाकिस्तानच्या हातातून सामना इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रूकने सामना खेचून आणला. गडी आज लवकर उतरला होता, सामना संपल्यावर त्याला हा सल्ला कोणी दिला होता त्याचे नाव त्याने सांगितले आहे.

इंग्लंडचे तीन फलंदाज पॉवरप्लेमध्ये किरकोळीत बाद झाल्यानंतरही कर्णधार हॅरी ब्रुकने टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या 'सुपर-८' फेरीत पाकिस्तानविरुद्ध धडाका कायम ठेवला. ब्रुकच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानचा पाच चेंडू आणि दोन विकेट राखून पराभव केला. यामुळे पाकची वाटचाल खडतर झाली आहे, तर इंग्लंडचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. पाकिस्तानचा खऱ्या अर्थाने ब्रुकनेच करेक्ट कार्यक्रम केला.

सामन्याच्या दिवशी सकाळी कोच ब्रेंडन मॅक्युलमने मला तीन नंबरला खेळायला सांगितले होते, तो म्हटलेला की

खेळायला तुला आवडतं, मग यावर विचार केला आणि म्हटलं चला करून बघूयात. या योजनेमागचा तोच मास्टरमाईंड होता. आम्ही पॉवर प्लेचा आणखी फायदा घेण्याचा प्रयत्न करत होतो. दुर्देवाने आमची फील्डिंग खराब राहिली, पण आम्ही पूर्ण प्रयत्न केल्याचं

PAK vs ENG: मॅच गमावल्यानंतरही पाकिस्तान कर्णधार सलमान अली आगाकडून भरभरुन कौतुक; काय म्हणाला?

पल्लिकल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये ही लढत झाली. साहिबझादा फरहानच्या आक्रमक अर्धशतकास फखर झमान आणि शादाब खानच्या अखेरच्या षटकांतील आक्रमकतेची साथ लाभली. त्यामुळे पाकने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. घटकामागे आठ धावांचे लक्ष्य असताना शाहीन शाह आफ्रिदीने इंग्लंडच्या फिल सॉल्ट (०), जोस बटलर (२) आणि जेसब बेथेलला (८) माघारी पाठविले. या वेळी इंग्लंडची ४.५ षटकांत ३ बाद ३५ अशी स्थिती होती.

IND vs ZIM : टीमला मोठा धक्का, रिंकू सिंग अचानक घरी परतल्याने प्लेइंग 11 मध्ये मॅचविनरची एन्ट्री फिक्स, नेमका कोण?

मैदानात आल्यावर लगेचच बुकला फिरकीचा सामना करावा लागू नये, म्हणून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला. टी-२० मध्ये प्रथमच या क्रमांकावर खेळताना ब्रुकने शतकी खेळी केली. त्याने ४ बाद ५८ वरून डाव सावरताना सॅम करनसह २८ चेंडूंत ४५ आणि विल जॅक्ससह ३१ चेंडूंत ५२ धावा जोडल्या. मात्र, बुकसह इंग्लंडचे तीन फलंदाज सहा धावांत १२ चेंडूंत परतले. त्यामुळे इंग्लंडची ५ बाद १५५ वरून ८ बाद १६१ अशी स्थिती झाली. अखेरच्या सहा चेंडूंत इंग्लंडला विजयासाठी तीन धार्वाची गरज असताना जोफ्रा आर्चरने सलमान मिझांला पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.दाजांच्या नंदनवनात पाकचे फलंदाज पूर्ण सूत्रे हाती घेणार नाही, ही काळजी इंग्लंडने घेतली. साहिबझादा फरहानने बाबर आझमसह ४४ चेंडूंत ४६ आणि फखर झमनसह ३० चेंडूंत ४९ धावा जोडून पाकला वर्चस्व मिळवून दिले होते. मात्र, १५.३ षटकातील ३ बाद १२२वरून पाकला जेमतेम १६४ धावाच करता आल्या. या पडझडीतही शादाबने केलेली फटकेबाजी महत्त्वाची ठरली. खर तर इंग्लंडला खराब क्षेत्ररक्षणाचा फटका जास्त बसला.

हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

IND vs ZIM : टीमला मोठा धक्का, रिंकू सिंग अचानक घरी परतल्याने प्लेइंग 11 मध्ये मॅचविनरची एन्ट्री फिक्स, नेमका कोण?

PAK vs ENG: मॅच गमावल्यानंतरही पाकिस्तान कर्णधार सलमान अली आगाकडून भरभरुन कौतुक; काय म्हणाला?

Pakistan Semifinal Scenario: एका जागेसाठी तीन संघामध्ये मारामारी; सेमीफायनलसाठी पाकिस्तानला काय करावं लागणार?

PAK vs ENG: हॅरी ब्रूकचं वादळी शतक; इंग्लंडची सेमीफायनलमध्ये एन्ट्री; पाकिस्तान थेट वर्ल्ड कपमधून बाहेर?

Ravi Shashtri: भारताचा पराभव झाला याचा मला आनंद... रवी शास्त्रींच्या विधान चर्चेत; आफ्रिकेविरुद्ध मॅच गमावल्यानंतर असं का म्हणाले?

Rinku Singh: झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी भारतीय संघासाठी आली वाईट बातमी; खेळाडूला अचानक सोडावा लागला संघ; कारण काय?

Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad