Loading
मुंबई, १६ ऑक्टोबर २०२४ — महाराष्ट्रातील महायुती सरकारविरोधात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली NSUI ने आज ‘#गद्दारांचा_पंचनामा’ अहवालाचे विमोचन केले. या अहवालात राज्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण करणाऱ्या आणि वैयक्तिक स्वार्थासाठी जनतेचा विश्वासघात करणाऱ्या नेत्यांचे पर्दाफाश करण्यात आले आहे. हा कार्यक्रम NSUI महाराष्ट्र आणि मुंबई प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पार पडला, ज्यामध्ये NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी, अक्षय यादव क्रांतिवीर जी, NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. आमिर शेख, NSUI मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रद्युम्न यादव, NSUI महाराष्ट्र प्रभारी अर्जुन चपराना, NSUI मुंबई प्रभारी कुणाल पाटील, NSUI मीडिया डिपार्टमेंटचे राष्ट्रीय अध्यक्ष रवि पांडे आणि NSUI महाराष्ट्र सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अभिजीत हल्देकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी सुरभी त्रिवेदी, उमेश खंदारे आणि सागर साळुंके यांनी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कार्यक्रमात बोलताना NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी म्हणाले की, ही मोहीम केवळ राजकीय प्रश्न नसून जनतेचा विश्वास जपण्यासाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी घेतलेला प्रयत्न आहे. त्यांनी सांगितले की, NSUI जनतेला या गद्दारांना ओळखण्यास मदत करेल आणि योग्य सरकारला पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहन देईल. यावेळी NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. आमिर शेख म्हणाले की, या अहवालामुळे गद्दारांचे खरे चेहरे उघडकीस आले आहेत, ज्यांनी राज्याच्या लोकशाहीशी प्रतारणा केली आहे. NSUI ने नेहमीच जनतेचा आवाज उठवला आहे आणि भविष्यातही अन्यायाविरोधात लढा सुरूच राहील.
NSUI मीडिया डिपार्टमेंटचे राष्ट्रीय अध्यक्ष रवि पांडे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले की, “महाराष्ट्रातील विद्यार्थी लवकरच हे सरकार बदलतील, आणि महाविकास आघाडीची सत्ता परत येताना सगळे पाहतील.”
या विमोचनानंतर NSUI ने राज्यभर जनजागृती अभियान राबवण्याचा निर्धार केला आहे. महाविद्यालयीन परिसरांत आणि प्रमुख शहरांमध्ये रॅल्या व सभा आयोजित केल्या जातील, जेणेकरून तरुणांना राज्यातील राजकीय कट-कारस्थानांबद्दल जागरूक करता येईल. या बैठकीत सर्व प्रांतीय आणि जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांनी सहभाग घेतला आणि NSUI च्या आगामी रणनीतींवर सखोल चर्चा केली.