Loading
Neena Gupta On Marriage; 'समाजात राहायचं असेल तर...' 50व्या वर्षी लग्न करण्याबद्दल स्पष्टच बोलल्या नीना गुप्ता
Neena Gupta Talks About Reason Of Getting Married At Age Of 50
Neena Gupta : 'समाजात राहायचं असेल तर...' 50व्या वर्षी लग्न करण्याबद्दल स्पष्टच बोलल्या नीना गुप्ता
Neena Gupta On Marriage : नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीमध्ये वयाच्या ५०व्या वर्षी लग्न करण्याबद्दल भाष्य केलं असून लग्न करण्याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांचं वयाच्या ५० व्या वर्षी लग्न झालं. २००८ मध्ये त्यांनी दिल्लीतील चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं. त्याआधी त्या सिंगल मदर होत्या आणि त्यांची मुलगी मसाबा गुप्तासोबत राहत होत्या. अर्ध्याहून अधिक आयुष्य एकटीनं घालवल्यानंतर नीना गुप्ता यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशातच आता नीना गुप्ता यांनी त्यांच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.
नीना गुप्ता यांना वयाच्या ५०व्या वर्षी लग्न करण्याबद्दल विचारण्यात आलं. मुलाखतीदरम्यान नीना यांना विचारण्यात आलं की, त्यांनी प्रेमात पडल्यानंतर लग्न केलं का? त्यावर नीना गुप्ता म्हणाल्या की, 'त्याबद्दल मी आणखी एक पुस्तक लिहिणार आहे.' नीना म्हणाल्या, 'बघा! मला ही प्रेमाची गोष्ट समजत नाही. मला फक्त माझ्या मुलीसाठीचं प्रेम समजतं आणि मला दुसरं कोणतंही प्रेम समजत नाही.'
त्यानंतर नीना यांना विचारण्यात आलं की जर त्यांना प्रेम समजत नसेल तर त्यांनी लग्न का केलं. या प्रश्नावर नीना म्हणाल्या, 'खूप मोठी गरज होती.' पुढे नीना यांना विचारलं की, त्यांनी समाजाला दाखवण्यासाठी
केलं आहे का की म्हातारपणासाठी? यावर नीना म्हणाल्या 'जर आपल्याला या समाजात राहायचं असेल तर आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागेल. मी माझ्या चुकांमधून हे शिकले आहे.'
Samir Choughule : समीर चौघुले यांच्या शिरपेचात मानाचा तुरा, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना; प्राजक्ता माळीनंही केलं कौतुक
नीना गुप्ता यांनी स्पष्ट केलं की जेव्हा-जेव्हा त्या बाहेर जायच्या तेव्हा त्यांना विचित्र नजरेनं पाहिलं जायचं, परंतु लग्न केल्यानंतर असं झालं नाही . 'मी जेव्हा जेव्हा बाहेर जायचे तेव्हा मला विचित्र नजरेनं पाहिलं जायचं, पण एकदा माझं लग्न झाले की सर्व काही बंद झालं. हे सांगायला खूप त्रासदायक आहे, पण ही सद्यस्थिती आहे.' असं नीना गुप्ता म्हणाल्या.
Somy Ali : 'मला मुलीसारखं वागवलं, त्यांचं माझ्या आयुष्यातील महत्त्व...' सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची सलीम खान यांच्यासाठी भावूक पोस्ट
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता ही नीना आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे.
"तेजश्री राजेंद्र कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये एक वर्षांपासून 'कन्सल्टन्ट' या पदावर कार्यरत. चालू घडामोडींसोबतच मनोरंजन, फॅशन, क्राईम, अशा वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड. वझे केळकर महाविद्यालयातून मराठी साहित्यात पदवी आणि CHM महाविद्यालयातून मराठी साहित्याचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. "
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
९ ते १० किलो वजन वाढवलं, Rajkummar Rao च्या व्हायरल लुकचं सत्य आलं समोर; उज्ज्वल निकम यांच्याशी आहे कनेक्शन
Salim Khan Health: 'सौम्य ब्रेन हॅम्रेज, पण सर्जरी नाही'; सलीम खान यांच्या तब्येतीसंदर्भात लीलावतीच्या डॉक्टरांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स
37 व्या वर्षी सिंगल, 38 मध्ये नवऱ्याशी भेट, 39 मध्ये लग्न आणि चाळीशीत गरोदर... Jui Gadkari ला हवंय असं आयुष्य, पोस्टमधून दिली हिंट
Somy Ali : 'मला मुलीसारखं वागवलं, त्यांचं माझ्या आयुष्यातील महत्त्व...' सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची सलीम खान यांच्यासाठी भावूक पोस्ट
Samir Choughule : समीर चौघुले यांच्या शिरपेचात मानाचा तुरा, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना; प्राजक्ता माळीनंही केलं कौतुक
The Kerala Story 2: 'पुढील २५ वर्षांत भारत एक इस्लामिक राष्ट्र होईल आणि..', द केरला स्टोरी २चा ट्रेलर रिलीज, नितेश राणेंचं ट्विट व्हायरल
Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :