Loading
BMC Budget 2026: आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प, पाहा प्रत्येक लाइव्ह अपडेट फक्त एका क्लिकवर
Breaking News 25th February 2026 Maharashtra Budget Session Live Updates Weather Latest Imd Rain Alert
BMC Budget 2026: आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प, पाहा प्रत्येक लाइव्ह अपडेट फक्त एका क्लिकवर
BMC Budget 2026 Live: आज, 25 फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होईल. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. राज्याच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही विरोधी पक्षनेत्याशिवाय असतील. 22 फेब्रुवारी रोजी मुंबईहून मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या राजकीय गणितांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. विधानसभेत आणि 78 सदस्यांच्या विधान परिषदेत आवश्यक संख्याबळ गोळा करण्यात विरोधकांना अपयश आले आहे, ज्यामुळे विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती होऊ शकली नाही. दरम्यान, राज्यात बऱ्याच जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपलं आहे.
Maharashtra Budget Session: बीड जिल्ह्याचा विसर, धनंजय मुंडे थेट बोलले; अध्यक्षांनी रोखताच विधानसभेत गोंधळ
Maharashtra Budget Session: आमदारांना वेळेत उपस्थित राहण्याचा आदेश
काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस होता.. विरोधी पक्षांच्या आमदारांच्या वतीने विधान भवन पायऱ्यांवर नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयात झालेल्या लाचखोरी प्रकरणी निदर्शने केली गेली.. विधान भवन येथील पायऱ्यांवर निदर्शने करतांना आमदारांची अत्यल्प उपस्थिती.. परिणामी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी आमदारांना वेळेत उपस्थित राहण्याची तंबी दिलेली आहे..
Crime News: एक्स गर्लफ्रेंडच्या मित्राच्या घराचा भागात टोळक्याकडून दुचाकींची तोडफोड
सोशल मीडियावरील मैत्रीच्या कारणावरून वैयक्तिक वाद चिघळत थेट रस्त्यावर दहशतीचे रूप धारण केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली आहे. महाल परिसरातील गाडीखाना आणि जोहरीपुरा भागात मंगळवारी उशिरा रात्री काही तरुणांच्या टोळक्याने अर्धा डझनहून अधिक दुचाकींची तोडफोड करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले.
Panvel Crime: पनवेल-तळोजा घोट कॅम्पमध्ये धक्कादायक कारवाई
पनवेलजवळील तळोजा परिसरातील घोट कॅम्प मध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्षाने धाडसी कारवाई केली. या कारवाईत १ कोटी १९ लाख ५० हजार रुपयांचा हेरॉईन व अफू जप्त केला गेला असून, पंजाबमधील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, एका ट्रकचालकाचा शोध अद्याप सुरू आहे.
कुरूळ येथील दत्त टेकडीवर पाच वर्षांपूर्वी घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा अखेर न्यायालयीन शेवट झाला असून वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून उसळलेल्या सूडभावनेला कायद्याने कडक लगाम घातला आहे. भावांतील दीर्घकाळ चाललेल्या जमिनीच्या वादाने प्राणघातक वळण घेत एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला होता.
अवघा कोकण हा केमिकल झोन म्हणून डिक्लेअर झाला आहे त्यामुळे प्रत्येक गावामध्ये आता अनेक कॅन्सरचे पेशंट मिळत आहेत, केमिकल झोन कोकणात आमच्याकडे आहे मी ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो ते लोटे त्या ठिकाणी आज घराघरातून माणसं घाबरून कॅन्सल झालाय कॅन्सल झालाय सांगून टेस्ट करतायेत काहीजण घाबरून टेस्ट करत नाहीत, त्यामुळे कोकणात कॅन्सर हॉस्पिटल उभारा अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.
Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावात
संत नगरी शेगाव येथे आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहे .सर्वप्रथम सकाळी 11 वाजता शेगावात आगमन झाल्यानंतर श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रींचे दर्शन व आरती व त्यानंतर दुपारी बारा वाजता राष्ट्रीय महाआरोग्य शिबिर 2026 चे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे
Maharashtra Budget Session: 'पुरवणी'ला मुख्यमंत्र्यांची कात्री
प्रत्येक अधिवेशनात पुरवणी मागण्यांचा नवा विक्रम करण्याच्या आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा चाप लावला आहे. विधिमंडळाच्या गेल्या दोन अधिवेशनांमध्ये अनुक्रमे ५७ हजार कोटी रुपये आणि ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या असताना यंदा त्यास कात्री लावताना अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांत मंगळवारी ११,९९५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.
Nashik Earthquake: तीन दिवसांत हरसूल-पेठ परिसरात भूकंपाचे पाचवेळा सौम्य धक्के
हरसूल आणि पेठ परिसरात सलग तीन दिवसांपासून जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारपासून (दि. २२) सुरू झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांची मालिका मंगळवारीही (दि. २४) कायम राहिली. या कालावधीत तब्बल पाचवेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची नोंद मेरी येथील भूकंपमापन केंद्रात करण्यात आली.
BMC Budget 2026 Live: आज मुंबई महापालिकेचा अर्थसकंल्प सादर होणार असून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, 22 फेब्रुवारीपासून सुरू झालं असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.
Copyright - 2022 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :