Loading
IND vs ZIM : टीमला मोठा धक्का, रिंकू सिंग अचानक घरी परतल्याने प्लेइंग ११ मध्ये मॅचविनरची एन्ट्री फिक्स, नेमका कोण?
T20 International Cup 2026 Ind Vs Zim Kuldeep Yadav May In Playing 11 Against Zimbabwe
IND vs ZIM : टीमला मोठा धक्का, रिंकू सिंग अचानक घरी परतल्याने प्लेइंग 11 मध्ये मॅचविनरची एन्ट्री फिक्स, नेमका कोण?
IND vs ZIM Match : वर्ल्ड कप सुरू असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू रिंकू सिंग घरी परतला आहे. वडिलांची तब्येत नसल्याने तो गेलाय, त्यामुळे त्याच्या जागी आता कोणत्या मॅचविनरची एन्ट्री फिक्स मानली जात आहे.
भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिंकू सिंग अचानक घरी परतला आहे.वडिलांची तब्येत बरी नसल्याने त्याला तातडीने घराकडे जावे लागले. त्यामळे आता उद्या २६ फेब्रुवारीला होणाऱ्या झिम्बाब्वेविरूद्ध संघ निवडताना तो नसणार आहे. मात्र मागील अनेक सामन्यांमध्ये तो भारताच्या प्लेइंग ११ चा भाग राहिला आहे, आता मागील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातही तो प्लेइंग ११मध्ये होता,त्यामुळे आता त्याची जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करावी लागणार आहे. टीम मॅनेजमेंट मॅचविनरला खेळवण्याचा विचार करत असल्याची माहिती समजत आहे.
क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने तोंड पोळलेला भारतीय संघ आपला फिरकी मारा अधिक भक्कम करण्याचा विचार करीत आहे. त्याचदृष्टीने अक्षर पटेलचे झिम्बाब्वेविरुद्ध पुनरागमन निश्चित आहे. एवढेच नव्हे तर
निवड करून भारतीय फिरकी मारा अधिक धारदार करण्याबाबत संघव्यवस्थापन विचार करीत आहे.
PAK vs ENG: मॅच गमावल्यानंतरही पाकिस्तान कर्णधार सलमान अली आगाकडून भरभरुन कौतुक; काय म्हणाला?
दक्षिण आफ्रिका संघातील डावखुरे फलंदाज धोकादायक ठरू नयेत यासाठी अक्षर पटेलऐवजी वॉशिंग्टन सुंदरची निवड झाली होती. मात्र वॉशिंग्टन गोलंदाजीस येण्यापूर्वीच क्विंटॉन डिकॉक आणि रायन रिकल्टन बाद झाले होते आणि भारतीय गोलंदाजीची गणिते चुकली. वॉशिंग्टन सुंदर हा फलंदाजीतही अपयशी ठरला. झिम्बाब्वे संघातही तादी मारुमानी आणि रियान बुरी हे डावखुरे फलंदाज आहेत. या परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदर संघात राहणार की, अक्षर पटेल याला संधी मिळणार हाही विचार होत असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, रिंकू सिंग हा या सामन्यात नसल्यामुळे भारतीय संघातील बदल निश्चित आहे. रिंकूऐवजी कुलदीप यादव हा पर्यायही विचाराधीन आहे.
Pakistan Semifinal Scenario: एका जागेसाठी तीन संघामध्ये मारामारी; सेमीफायनलसाठी पाकिस्तानला काय करावं लागणार?
रिंकू सिगचे वडील आजारी आहेत, त्यामुळे तो तातडीने घरी परतला आहे. तो झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याच्यावेळी संघनिवडीस उपलब्ध नसेल, असे भारतीय क्रिकेट बोडांतील सुत्रांनी सांगितले. रिकुंकूंचे वडील खानचंद सिंग यांना नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिंकू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भोपळा फोडू शकला नव्हता. त्याने नेदरलँड्सविरुद्ध ६, पाकिस्तानविरुद्ध ११, नामिबियाविरुद्ध १ आणि अमेरिकेविरुद्ध ६ धावा केल्या होत्या.
हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
PAK vs ENG: मॅच गमावल्यानंतरही पाकिस्तान कर्णधार सलमान अली आगाकडून भरभरुन कौतुक; काय म्हणाला?
Pakistan Semifinal Scenario: एका जागेसाठी तीन संघामध्ये मारामारी; सेमीफायनलसाठी पाकिस्तानला काय करावं लागणार?
PAK vs ENG: हॅरी ब्रूकचं वादळी शतक; इंग्लंडची सेमीफायनलमध्ये एन्ट्री; पाकिस्तान थेट वर्ल्ड कपमधून बाहेर?
Ravi Shashtri: भारताचा पराभव झाला याचा मला आनंद... रवी शास्त्रींच्या विधान चर्चेत; आफ्रिकेविरुद्ध मॅच गमावल्यानंतर असं का म्हणाले?
Rinku Singh: झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी भारतीय संघासाठी आली वाईट बातमी; खेळाडूला अचानक सोडावा लागला संघ; कारण काय?
IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात टॉस ठरणार बॉस; सेमीफायनलचं तिकीट पक्क करण्यासाठी नाणेफेक का महत्त्वाची ठरणार?
Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :