Mar, 13 2026

ICC Ranking : पाकिस्तानला लोळवल्यावर ICCची भारताला आनंदाची बातमी, रँकिंगमध्ये ईशानची १७ स्थानांची झेप, अभिषेक कुठे?


Image Source By : Digital Satta

ICC Ranking : पाकिस्तानला लोळवल्यावर ICCची भारताला आनंदाची बातमी, रँकिंगमध्ये ईशानची १७ स्थानांची झेप, अभिषेक कुठे?


Icc Ranking Ishan Kishan Enter Top 10 In T20 Abhishek Sharma Number One In List

ICC Ranking : पाकिस्तानला लोळवल्यावर ICCची भारताला आनंदाची बातमी, रँकिंगमध्ये ईशानची १७ स्थानांची झेप, अभिषेक कुठे?


महत्वाचे मुद्दे

  • ICC Ranking : पाकिस्...
  • ...

ICC Ranking Ishan Kishan News : वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानला लोळवल्यावर आयसीसीने भारतालाआनंदाची बातमी दिली आहे. आयसीसी रँकिंग जाहीर झाली असून ईशान किशनने गरूडझेप घेतली आहे. दोन सामन्यात शून्यावर गेलेला अभिषेक कुठे? जाणून घ्या.

टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा स्टार खेळाडू ईशान किशन याने आपल्या बॅटींगने धुमाकूळ घातला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेपासून त्याची बॅट तळपत आहे. आताही साखळी सामन्यांमध्ये त्याने झलक दाखवून दिली. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये ईशानच्या वादळी खेळीने भारताने सामना जिंकला होता. कमबॅक केलेल्या ईशान किशन याने संघात आल्यापासून आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. अशातच आयसीसीकडूनही त्याच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे.

याने टी२० फॉरमॅटमध्ये थेट १७ स्थानांनी झेप घेत थेट टॉप १० मध्ये एन्ट्री केली आहे. ईशान किशन हा टी२० बॅटींगच्या रँकिंगमध्ये ७३२ गुणांसह आठव्या स्थानावर आला आहे. त्यासोबतच तिलक वर्मा एक स्थानाने प्रगती करत ७५१ ग गुणांसह चौथ्या स्थानी पोहोचला आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादव ७४७ गुणांसह सहाव्या स्थानावर कायम आहे. दोन्ही सामन्यामध्ये शून्यावर आऊट होणाऱ्या अभिषेक शर्माला १७ गुणांचे नुकसान झाले असून तरीही तो ८९१ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिला शतकवीर ठरलेल्या पाथुम निसंका यालाही लॉटरी लागली आहे. रँकिंगमध्ये ७८६ गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतलीय. त्याआधी तो सहाव्या स्थानावर होता. या रँकिंगमध्ये २२ स्थानांनी झेप घेत आफ्रिकेचा फंलदाज रिकल्टन ११ व्या स्थानी पोहोचला आहे.

Team India Super-8 Matches : सुपर-8 मधील टीम इंडियासह सर्व सामन्यांचं शेड्यूल समोर, रविवारी कोणाविरूद्ध पहिली मॅच, जाणून घ्या

या रँकिंगमध्ये वरूण चक्रवर्ती याने आपले नंबर एकचे स्थान कायम ठेवले आहे. ७९६ गुणांनी त पहिल्या स्थानावर असून राशिद खान ७४९ गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अक्षर पटेल चार आणि जसप्रीत बुमराह सहा स्थानांनी वर आले असून अनुक्रमे १४ आणि १५ व्या स्थानावर पोहोचला आहे.

IND vs NED : टीम इंडिया नेदरलँडविरूद्ध 3 हुकमी एक्क्यांना बसवणार? प्लेइंग 11 मध्ये कोणाची एन्ट्री फिक्स, जाणून घ्या

वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर ईशान किशन याने तीन सामन्यात ५२.६६च्या सरासरीने १५८ धावा केल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा पहिला तर वर्ल्ड कपमधील पाचवा खेळाडू ठरला आहे. सुपर-८ फेरीमधून त्याच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा असणार आहेत. कारण अभिषेक शर्मा हा चांगल्या फॉर्ममध्ये नसल्याने ईशानची जबाबदारी जास्त वाढली आहे.

हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

IND vs PAK : आयसीसी भारत-पाक वादामुळे वर्ल्डकपबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? मोठी माहिती समोर

Team India Super-8 Matches : सुपर-8 मधील टीम इंडियासह सर्व सामन्यांचं शेड्यूल समोर, रविवारी कोणाविरूद्ध पहिली मॅच, जाणून घ्या

IND vs NED : टीम इंडिया नेदरलँडविरूद्ध 3 हुकमी एक्क्यांना बसवणार? प्लेइंग 11 मध्ये कोणाची एन्ट्री फिक्स, जाणून घ्या

Rohit Sharma : नम्रता संभेराव म्हणाली, तुमच्याशी मराठीत बोलते; रोहित शर्माचं उत्तर ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

IND vs NED : वर्ल्ड कप लीग स्टेजमधील भारताचा आज शेवटचा सामना; कधी, कुठे आणि कोणाचं आव्हान असणार?

Imran Khan यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह जगभरातील 14 क्रिकेटपटू एकवटले, पाकिस्तान सरकारला पाठवले पत्र

Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad