Mar, 12 2026

France Bans US Ambassador: अमेरिकी राजदूतांवर फ्रान्सची बंदी; बैठकीला गैरहजर राहिल्याने कठोर पाऊल


Image Source By : Digital Satta

france bans us ambassador takes strict action for absenteeism from meeting ; अमेरिकी राजदूतांवर फ्रान्सची बंदी; बैठकीला गैरहजर राहिल्याने कठोर पाऊल | Maharashtra Times


France Bans Us Ambassador Takes Strict Action For Absenteeism From Meeting

France Bans US Ambassador: अमेरिकी राजदूतांवर फ्रान्सची बंदी; बैठकीला गैरहजर राहिल्याने कठोर पाऊल

France Bans US Ambassador: अधिकृत समन्स बजावूनही अमेरिकी राजदूत बैठकीला गैरहजर राहिल्याने फ्रान्सने हे कडक पाऊल उचलले आहे.

फ्रान्स आणि अमेरिकेतील राजनैतिक वाद विकोपाला गेला असून,

यांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला. जोपर्यंत अमेरिकी राजदूत समन्सला उत्तर देत नाहीत, तोपर्यंत त्यांना फ्रान्स सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला भेटता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

यांचे व्याही आणि सल्लागार जॅरेड कुशनर यांचे वडील चार्ल्स कुशनर सध्या फ्रान्समध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आलेल्या काही वादग्रस्त विधानांवर स्पष्टीकरण मागण्यासाठी फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी कुशनर यांना पाचारण केले होते. मात्र, कुशनर या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. या प्रकाराबद्दल अमेरिकी दूतावासाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

चिकन नेकच्या मुद्द्यावर भारताला नेपाळमधून आनंदवार्ता, पीएम पदाच्या दावेदाराचा चीनला झटका

‘राजदूतांचे बैठकीला न येणे हे धक्कादायक असून, ते राजनैतिक शिष्टाचाराच्या विरोधात आहे. यामुळे

यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोणत्याही राजदूताला आपले काम चोखपणे होण्यासाठी सरकारमधील सदस्यांशी संपर्क असणे आवश्यक असते, जो त्यांनी स्वतःच गमावला आहे,’ असे बॅरोट म्हणाले. ‘जेव्हा कुशनर स्पष्टीकरण देतील, तेव्हाच त्यांना पुन्हा सरकारी भेटींची परवानगी दिली जाईल,’ असेही त्यांनी सांगितले.

फ्रान्समधील लिऑन शहरात या महिन्याच्या सुरुवातीला डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत २३ वर्षीय कट्टर उजव्या विचारसरणीच्या क्विंटिन डेरान्क या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेवरून अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या दहशतवादविरोधी विभागाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात म्हटले होते, की ‘हिंसक डाव्या कट्टरतावादाचा धोका वाढत असून, डेरान्कचा मृत्यू हे सार्वजनिक सुरक्षिततेसमोरील आव्हानाचे उदाहरण आहे.’ फ्रान्समधील अमेरिकी दूतावासानेही हेच विधान फ्रेंच भाषेत प्रसिद्ध केले. फ्रान्सने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

US Iran Tensions: अमेरिकेवर नामुष्की! जगातील सर्वात मोठ्या युद्धनौकेवर 'टॉयलेट वॉर'; सैनिक एकमेकांना का भिडले?

चार्ल्स कुशनर यांनी अशा प्रकारे समन्स धुडकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या ऑगस्टमध्येही फ्रान्समधील ज्यू-विरोधी भावनेवर भाष्य करणारे पत्र फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना लिहिल्याबद्दल त्यांना पाचारण करण्यात आले होते. तेव्हाही कुशनर स्वतः न जाता त्यांनी आपल्या उप-अधिकाऱ्याला पाठवले होते. ‘हा वाद कुशनर यांच्या वैयक्तिक जबाबदारीचा भाग असून, यामुळे फ्रान्स आणि अमेरिका यांच्यातील व्यापक द्विपक्षीय संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही,’ असेही फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

चिकन नेकच्या मुद्द्यावर भारताला नेपाळमधून आनंदवार्ता, पीएम पदाच्या दावेदाराचा चीनला झटका

US Iran Tensions: अमेरिकेवर नामुष्की! जगातील सर्वात मोठ्या युद्धनौकेवर 'टॉयलेट वॉर'; सैनिक एकमेकांना का भिडले?

ना बहीण, ना मुलगी...; किम जोंगनं निवडलेला उत्तर कोरियातील दुसरा पॉवरफुल व्यक्ती कोण?

PM Pm: आम्हाला भारताची नाचक्की करायची नाही! PM मोदींच्या दौऱ्याआधी इस्रायलमध्ये घमासान; बहिष्काराचा इशारा

तात्काळ देश सोडा! मित्र राष्ट्रात तणावाची स्थिती, US कडून हल्ल्याची भीती, सरकारचा भारतीयांसाठी अलर्ट

पोलीस ऑफिसर ते ड्रग्ज लॉर्ड El Mencho; गुन्हेगाराचा मृत्यू होताच मॅक्सिको का पेटलं? VIDEO समोर

Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad