Mar, 13 2026

Aastad Kale : 'रात्री रेशमला टकटक ऐकायला आली, ती घाबरली आणि...' आस्ताद काळेनं सांगितला बिग बॉसच्या घरातील प्रसंग


Image Source By : Digital Satta

Aastad Kale On Bigg Boss Marathi; 'रात्री रेशमला टकटक ऐकायला आली, ती घाबरली आणि...' आस्ताद काळेनं सांगितला बिग बॉसच्या घरातील प्रसंग


Aastad Kale Shares Shocking Incident Of Bigg Boss Marathi

Aastad Kale : 'रात्री रेशमला टकटक ऐकायला आली, ती घाबरली आणि...' आस्ताद काळेनं सांगितला बिग बॉसच्या घरातील प्रसंग

Aastad Kale On Bigg Boss Marathi : आस्ताद काळेनं बिग बॉसच्या घरातील एक प्रसंग सांगितला आहे.

सध्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या सीझनच्या स्पर्धकांची चर्चाही कायम होत असते. त्याचबरोबर यंदाच्या पर्वाची तुलना बिग बॉस मराठीच्या आधीच्या सीझनसोबत केली जाते आहे. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आस्ताद काळेनं बिग बॉसच्या घरातील एक प्रसंग सांगितला आहे.

'Chhaava हा वाईट सिनेमा', Aastad Kale ची मध्यरात्री Facebook पोस्ट, सकाळी केली डिलिट

आधीच्या सीझनच्या स्पर्धकांनी 'अभिजात मराठी'ला मुलाखत दिली. आस्ताद काळे बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभागी झालेला. या मुलाखतीमध्ये बिग बॉसच्या घरातील प्रसंग सांगताना आस्ताद काळे म्हणाला की, 'मी जिथे झोपायचो ना, म्हणजे हा बेडचा हेडबोर्ड असेल तर त्या कोपऱ्यामध्ये प्लायला थोडंसं भोक पडलं होतं. पहिल्याच दिवशी मला गेल्या-गेल्या ते दिसलं. मी बघितलं, तर त्यात डेनिम घातलेला कॅमेरामनचा पाय दिसला. जिवंत माणूस ऑपरेट करायला मागे बसला होता. संपूर्ण सेटवर सहा की सात DOP होते. आमच्या सेटवर २५० माणसांचं युनिट होतं. रेशमताईच्या बेडच्या वरती जी काच होती म्हणजेच वन वे मिरर होता. तिथे तिला रात्री टकटक ऐकायला आली. ती घाबरली आणि हॉलमध्ये जाऊन बसली.'

Samir Choughule : समीर चौघुले यांच्या शिरपेचात मानाचा तुरा, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना; प्राजक्ता माळीनंही केलं कौतुक

'तू पण टकटक कर मग', असं मी तिला म्हटलं. 'पण याची परवानगी नाहीये', असं रेशम मला म्हणाली. 'मग तो जो कोणी असं करतोय, त्यालाही याची परवानगी नाहीये', असं मी तिला म्हणालो. पुढे मग रेशम बेडजवळ गेली. पलीकडून टकटक आल्यावर तिनेही तसंच केलं आणि ती पळून गेली. दोन-तीनदा असंच झालं. नंतर त्यांना कळालं की, पलीकडे कॅमेरामन होता. त्याला नंतर काढून टाकण्यात आलं. कारण ही कृती

संपर्क साधण्यासारखी होती.' असं आस्तादने पुढे सांगितलं.

Neena Gupta : 'समाजात राहायचं असेल तर...' 50व्या वर्षी लग्न करण्याबद्दल स्पष्टच बोलल्या नीना गुप्ता

आणखी एक आठवण सांगत आस्ताद काळे म्हणाला की, 'फिनालेच्या आदल्या दिवशी शूटिंगचं युनिट आत आले परफॉर्मन्स शूट करायला. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही जे सहा जण उरलो होतो त्यांना कन्फेशन रूममध्ये बोलावलं. त्यावेळी तुषार जोशी आम्हाला प्रत्यक्ष भेटला. त्यावेळी त्याने आम्हाला सांगितलं की, उद्या चाळीस माणसांचं युनिट तुमचे परफॉर्मन्स शूट करायला येणार आहे. तर तयार राहा. हे ऐकून स्मिता गोंदकर घाबरली होती. ती बेडवर बसून होती आणि शूटिंग करायला बाहेर यायला तयार नव्हती. कारण अचानक आम्ही चाळीस लोकांना भेटणार होतो. त्याने आम्हाला दुसऱ्या दिवशीचा कॉल टाईम वगैरे दिला आणि सांगितलं की, आता इथून बाहेर गेलात की फक्त त्यातील पाच मिनिटांचं फुटेज ऑन एअर जाईल बाकी आम्ही घेणार नाही. कॅमेरे चालू असतील ते ओटीटीला वगैरे वापरलं जाईल. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की स्पर्धा संपली. आम्हाला अचानक रिकामं झाल्यासारखं वाटलं आणि आम्ही एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर रात्री आणि दुसऱ्या दिवशी पहाटे असं मिळून जवळपास साडे तीन-चार तास मी आणि मेघा गप्पा मारल्या. त्यात तिनं सगळ्या चुका कबूल केल्या. तिनं फुटेज बंद झालंय हे कळल्यावर तिचा सगळं गेम सांगितला. ती खरी मास्टरमाईंड होती.'

"तेजश्री राजेंद्र कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये एक वर्षांपासून 'कन्सल्टन्ट' या पदावर कार्यरत. चालू घडामोडींसोबतच मनोरंजन, फॅशन, क्राईम, अशा वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड. वझे केळकर महाविद्यालयातून मराठी साहित्यात पदवी आणि CHM महाविद्यालयातून मराठी साहित्याचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. "

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Rajpal Yadav: 'माझ्याच पैशांसाठी मी लहान मुलांसारखा रडलोय, मलाही आनंद होत नाहीए...', राजपाल यादव तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तक्रारदार बिझनेसमननं सोडलं मौन

Neena Gupta : 'समाजात राहायचं असेल तर...' 50व्या वर्षी लग्न करण्याबद्दल स्पष्टच बोलल्या नीना गुप्ता

९ ते १० किलो वजन वाढवलं, Rajkummar Rao च्या व्हायरल लुकचं सत्य आलं समोर; उज्ज्वल निकम यांच्याशी आहे कनेक्शन

Salim Khan Health: 'सौम्य ब्रेन हॅम्रेज, पण सर्जरी नाही'; सलीम खान यांच्या तब्येतीसंदर्भात लीलावतीच्या डॉक्टरांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

37 व्या वर्षी सिंगल, 38 मध्ये नवऱ्याशी भेट, 39 मध्ये लग्न आणि चाळीशीत गरोदर... Jui Gadkari ला हवंय असं आयुष्य, पोस्टमधून दिली हिंट

Somy Ali : 'मला मुलीसारखं वागवलं, त्यांचं माझ्या आयुष्यातील महत्त्व...' सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची सलीम खान यांच्यासाठी भावूक पोस्ट

Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad