Loading
सोलापूर, 20 सप्टेंबर। ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम एकदा लंपास झाली की ती परत मिळत नाही, असा समज आहे. मात्र, सोलापूर शहर सायबर पोलिसांनी एका न्यायाधीशांच्या पतीची शेअर मार्केटच्या नावाखाली लंपास केलेली तब्बल ४२ लाखांची रक्कम परत मिळवून दिली आहे. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी कारर्किदीतील संस्मरणीय गुन्हा असल्याचे सांगितले.
जून २०२४ मध्ये शेअर मार्केटमधून ज्यादा नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका न्यायाधीशांच्या पतीलाच ६२ लाखाला फसविले. त्यांनी आपले नाव उघड होणार नाही याची खबरदारी घेत, सायबर पोलिसांच्या १९३० या टोल फ्री क्रमांकावर ऑनलाइन तक्रार केली. फसवणूक झाल्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत, सोलापूर शहर सायबर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
न्यायालयाच्या माध्यमातून रक्कम होल्ड करण्याची परवानगी मिळवली. त्यानंतर आता रक्कम परत मिळणार नाही, असे समजून गप्प बसलेल्या त्या तक्रारदाराला अवघ्या दीड महिन्यात तब्बल ४२ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले.