Loading
नाशिक, 29 ऑगस्ट
- २४ ते २८ ऑगस्ट रोजी सोलापूर येथे सुरू असलेल्या ३०व्या राज्यस्तरीय सीनिअर सॉफ्टबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत एकूण ३० संघ सहभागी झाले होते. त्यात तब्बल १५ वर्षा पेक्षा जास्त असलेला पदकांचा दुष्काळ नाशिक संघाने संपवून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. संपूर्ण स्पर्धेत नाशिक संघाने एकतर्फी विजय मिळवून एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले. नाशिक संघाने साखळी सामन्यात सोलापूर संघाचा 9-0 , नागपूर संघाचा 8-0, बाद फेरीत परभणीच्या संघाचा 11-0, पुणे संघाचा 4-1, उपांत्य फेरीत अमरावतीच्या संघाचा 1-0 होमरन ने असा पराभव केला. अंतिम सामन्यात जळगाव संघाचं तगडं आव्हान नाशिक संघाने झेलून सुवर्ण पदक पटकाविले. नाशिक संघातील पिचर रोहन राऊत याने उत्कृष्ट खेळ करून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पिचर चा कीताब पटकाविला. रोहनला पूरक अशी साथ अनिकेत तांबडे, कुणाल शिंदे, विनय गोसावी यांनी हिटिंग करून विजयात मोलाची कामगिरी दिली. महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटना व नाशिक सॉफ्टबॉल संघटना यांच्या तर्फे संघातील खेळाडू, प्रशिक्षक, यांचे खूप खूप अभिनंदन केले .