Mar, 13 2026

शाळा महाविद्यालयात मिळालेले शिक्षण पुढील आयुष्याची दिशा ठरवते - राकेश पाटील


Image Source By : Digital Satta

अहमदनगर, 20 जुलै  शाळा,महाविद्यालय हे आपल्या भविष्याला उज्वल करणारी संस्था आहे.आपल्यातील गुणांना प्रोत्साहन देऊन जीवनातील स्पर्धेची तयारी ही या ठिकाणाहून होत असते.पालक,शिक्षक हे आपल्या चांगल्या भविष्या साठी झटत असतात.तेव्हा विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन कुटूंबाचे व शाळेचे नाव उज्वल करावे.१० वी व १२ वी नंतर आपणास शिक्षण क्षेत्रात अनेक संधी आहेत.आपण कोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करु शकतो.हे पाहून त्यादृष्टीने मार्गक्रमण करा.जिद्द,मेहनत व ध्येय ठेवून आपला पुढे चालले पाहिजे.आज मोठी स्पर्धा आहे.या स्पर्धेत टिकण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज आहे.शाळा,महाविद्यालयातून तुम्हाला मिळालेले शिक्षण पुढील आयुष्याची दिशा ठरवते.या जोरावर तुम्ही यशाची शिखरे पदक्रांत करु शकतात,असे प्रतिपादन व्हीआरडीई येथील टेक्निकल ऑफिसर राकेश पाटील यांनी केले.

शिशु संगोपन संस्थेच्या श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल,महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हीआरडीई येथील टेक्निकल ऑफिसर राकेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा,उपाध्यक्ष दशरथ खोसे,सचिव र.धों.कासवा,खजिनदार अ‍ॅड.विजय मुनोत,विश्‍वस्त मनसुखलाल पिपाडा,बन्सी नन्नवरे,सचिन डागा,सीमा गुंदेचा,माजी मुख्या ध्यापिका मनिषा पालवे,प्राचार्या कांचन गावडे आदि उपस्थित होते.

ad