Loading
अमरावती, 1 ऑगस्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आतापर्यंत जिल्हाभरामधून ३ लाख ७८ हजार ३६० महिलांनी अर्ज दाखल केले. ३१ जुलैपासून जिल्ह्यात अर्जाच्या छाननीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी कागदपत्रांमध्ये बदल केला होता. विशेष म्हणजे, योजना जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत जिल्हाभरात ३ लाख ७८ हजार ३६० अर्ज दाखल झालेत. ३१ जुलैपासून तालुकानिहाय अर्जाची छाननी सुरू झाली आहे. यापैकी किती महिलांचे अर्ज पात्र ठरतात आणि किती बाद होतात, हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळणार आहे. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा शासनाने केली आहे. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून महिला अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. बुधवारी छाननीला सुरुवात झाली असून पात्र- अपात्रांची यादी विधानसभा मतदारसंघनिहाय जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर ही यादी समितीकडे पाठविली जाणार असून ग्रामपंचायत स्तरावर चावडी वाचनाद्वारे पात्र- अपात्रांची नावे जाहीर होणार आहेत.
३१ ऑगस्टपर्यंत अर्जअर्जाची छाननी होणार असली तरी महिला ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेचे अर्ज भरू शकणार आहेत. २९ जुलैपासून छाननीचे काम सुरू झाले आहे. आता ऑनलाइन अर्जच स्वीकारले जातील. शासनामार्फत रक्षाबंधनाच्या पर्वावर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजारांची रक्कम जमा केली जाणार आहे.