Mar, 13 2026

राणा दाम्पत्याने केला विद्यार्थ्यांचा सत्कार


Image Source By : Digital Satta

अमरावती 29 जुलै युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवत्ताप्राप्त तसेच सीए व खेळांमध्ये प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा आ. रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते येथील सांस्कृतिक भवनात सत्कार करण्यात आला. ४,७२३ विद्यार्थ्यांना राणा दाम्पत्याच्या हस्ते प्रमाणपत्र, स्कूल बॅग व स्मृतिचिन्हाद्वारे कौतुकाची थाप देण्यात आलेली आहे. आ. रवी राणा व माजी खासदार नवनीत रवी राणा यांच्याद्वारा १५ वर्षांपासून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल सत्कार केल्या जातो. कार्यक्रमाला खा. डॉ अनिल बोंडे उपस्थित होते. आपण खासदार असताना विद्यार्थ्यांना संसद भवन दाखविले होते. त्यानुसार यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांना संसद भवन दाखवेल, अशी ग्वाही नवनीत राणा यांनी विद्यार्थ्यांना दिली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन आ. रवी राणा यांनी यावेळी केले.

ad