Loading
अमरावती 27 ऑगस्ट : मागील पाच वर्षापासून अमरावती जिल्ह्याचा विकास झालेला नाही. त्यामुळे यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदारांना त्यांची जागा जनतेने दाखवून दिली. आता आगामी काळात होणाऱ्या - विधानसभा निवडणुकीत आमदारांनाही त्यांच्या पदाला मुकावे लागेल. त्यामुळे आधी खासदारकी गेली आता आमदार की जाईल, असा - थेट इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार - यांनी राणा दांपत्याला दिला. राष्ट्रवादीचा सोमवारी शहरातील - जाधव पॅलेस येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आ. पवार यांनी महायुतीवर तोफ डागली. रोहित पवार म्हणाले, की भाजपने २०१४ पासून देशात जातीधर्मामध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून ते फेल ठरले आहे. देशात महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या,खासगीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेला कौल का पाहता भाजपला जनतेने नाकारले आहे. तसेच महाराष्ट्रातही महायुतीला आगामी काळात या प्रकाराला समोरे जावे लागणार आहे. मराठी माणूस त्यांना धडा शिकवेल. तीन महिन्यात महाविकास त आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त म केला. लोकसभेचा निकाल बघता भाजप सरकार घाबरलेल्या व स्थितीत आहे. तसेच महायुतीलाही राज्यात भीती असल्यामुळे त्यांनी विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्या. मात्र, त्यांना निवडणुका घ्याव्याच लागतील. २६ नोव्हेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील आणि या वेळी महाविकास आघाडीला २३० च्या वर जागा मिळतील, अशी आशा आ. रोहित पवार यांनी व्यक्त केली. या मेळाव्याला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.४ मतदारसंघाची मागणी,बडनेऱ्याला प्राधान्य आ. रोहित पवार यांनी सोमवारी रात्री अमरावतीत पत्रकारांसोबत संवाद साधला. आम्हाला जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आठ पैकी चार मतदारसंघ राष्ट्रवादीने लढवावेत, अशी मागणी केली.त्यामुळे या संदर्भात आम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ.मात्र बडनेरा मतदारसंघ आमच्या पक्षासाठी सुटावा, यासाठी प्राधान्याने प्रयत्न राहणार, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.रोहित पवार माझे चांगले मित्र: रोहित पवार हे माझे चांगले मित्र आहेत. ते जे काही बोलले असतील, ते मला मित्र म्हणून बोलले आहेत, असे आमदार रवी राणा म्हणाले.