Mar, 13 2026

पावसाने मेळघाटातील पिके धोक्यात शेतकरी चिंताग्रस्त


Image Source By : Digital Satta

अमरावती 8 ऑगस्ट

यावर्षी मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तालुक्यातील शेतकर्‍यांनी लागवड व पेरणी उरकून घेतलेली. मेळघाटात सुरूवातीला चांगला पाऊस पडल्याने उगवण चांगली झाली. वातावरण पोषक असल्याने खरिपाची पिके जोमात असताना गेले दहा ते पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. कापसावर रोगराई पडलेली दिसत असून पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचले आहे.

गेल्या आठवडाभर सूर्यकिरण नसल्यामुळे तूर, मूग, सोयाबीन, उडीदसह खरिपातील सर्वच पिके पिवळी पडू लागली आहेत. याचा फटका पिकांना बसलेला दिसत आहे. अशा या बिकट परिस्थितीत सर्व पिके जर हातातून गेली तर भविष्यात कसे होणार? या विचाराने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला आहे. कापसावर मर रोगासारखी रोगराई पडलेली दिसत आहे. मात्र, फवारणीही करता येत नाही. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील पाण्याचा निचरा होणे अत्यंत गरजेचे आहे.

ad