Loading
सोलापूर, 17 जुलै मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा सपत्नीक केली.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास
मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ परिवार
मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार
श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवतडे, आमदार
सचिन कल्याणशेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष
सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,
कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की हे सरकार सर्वसामान्याचे आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आजच्या
दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की राज्यातील शेतकरी, कामगार व
कष्टकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत
आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री
अन्नपूर्णा योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनेच्या माध्यमातून शासन
सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे
त्यांनी सांगितले.