Mar, 13 2026

नगर - पैलवान चेतन रेपाळे यांची राज्य फ्रीस्टाईल संघात निवड


Image Source By : Digital Satta

अहमदनगर, 14 ऑगस्ट : पारनेर तालुक्यातील पै. चेतन रेपाळे याची २३ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य संघ निवड स्पर्धेत फ्रीस्टाइल ९७ किलो वजन गटात प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली असून हरियाणा येथे १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ९७ किलो वजन गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.

या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ. संग्राम जगताप, उपाध्यक्ष महाराष्ट्र केसरी पै. शिवाजी शिर्के, पै. अर्जुन (देवा) शेळके, पै. शिवाजी चव्हाण, उप महाराष्ट्र केसरी बबन काशीद, महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे, उप महाराष्ट्र केसरी बापू थिटे, सचिव प्रा. डॉ. पै. संतोष भुजबळ, पै. पांडुरंग गुंजाळ, पै. मधुकर उचाळे, पै. रवींद्र वाघ, सह सचिव पै. प्रवीण घुले, पै. शिवाजी कराळे, उत्तर महाराष्ट्र केसरी पै. युवराज करंजुले, पै. उमेश भागानगरे, पै. नितीन काकडे,पै.शंकर खोसे,पै.प्रमोद गोडसे,पै.संदिप कावरे,पै.धनंजय खर्से,पै.अफजल शेख, पै. अतुल कावळे, पै. मोहन गुंजाळ तसेच सर्व पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन व पुढील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने नगर जिल्ह्यातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात असून त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे आम्ही सर्वजण उभे आहोत.खेळाडूंना हक्काचे व्यास पीठ निर्माण व्हावे यासाठी विविध वजन गटामध्ये स्पर्धेचे आयोजन केले जाते.क्रीडा स्पर्धेमध्ये देखील करिअर करण्याच्या संधी उपलब्ध असून त्यांना योग्य प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगर शहरामध्ये विविध खेळाचे मैदाने निर्माण होत असून भविष्यकाळात नगर जिल्हा हा क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक निर्माण करेल. पै. चेतन रेपाळे आपल्या खेळाच्या जोरावर नक्कीच नगर जिल्ह्याचा अभिमान वाढवेल असे मत आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

ad