Loading
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिले नियुक्तीपत्र
रांची, 31 ऑगस्ट : झारखंडच्या इतिहासात पहिल्यांदाच एका तृतीयपंथीला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आलेय. आमीर महतो असे या तृतीयपंथीचे नाव असून त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वतः अमीर महतो यांना नियुक्ती पत्र सुपूर्द केले.
आमीर महतो यांनी संबलपूर गावात नर्सिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्ती करण्यात आलेल्या 365उमेदवारांपैकी एक आहे. महतोच्या नियुक्तीमुळे, झारखंड हे बिहार, कर्नाटक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल नंतरच्या काही राज्यांपैकी एक बनले ज्यामध्ये सरकारी विभागांमध्ये तृतीयपंथीयची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झारखंड मंत्रिमंडळाने तृतीयपंथीयांसाठी जागा राखीव ठेवण्यास मंजुरी दिली होती. राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी कोट्याअंतर्गत आणि तृतीयपंथीयांसाठी सरकारी नियुक्त्यांमध्ये आरक्षणाची तरतुद केली आहे.