Loading
नाशिक , 19 सप्टेंबर ।
कस्टम विभागाने अखेर कांदा निर्यातीला परवानगी दिली असून आता कांदा विदेशात पाठविण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान दुसरीकडे काही अफवा देखील पसरविल्या जात असून अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या विदेशी निर्यात विभागाने कांद्यावरील किमान निर्यात शुल्क माफ केले होते. तर, निर्यात शुल्क हे 40 टक्के वरून वीस टक्के वरती आणले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपला कांदा हा निर्यात करण्यासाठी म्हणून मुंबईतील बंदरावरती पाठवला होता. तर, काही ट्रक हे बांगलादेश सीमेवरती आडविण्यात आलेले होते पण त्या ठिकाणी कस्टम विभागाला परवानगी नसल्यामुळे विविध ठिकाणी कांदा हा निर्यात होण्याऐवजी अडकून पडला होता. त्यानंतर या कांद्याचे नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त केली जात होती. परंतु कस्टम विभागाला याची परवानगी मिळाल्यानंतर तातडीने हा कांदा विदेशात पाठविण्यात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मुंबईतील बंदर आणि बांगलादेश सीमेवरती असलेल्या कांदा हा आता निर्यातीचा मार्ग मोकळा झालेला आहे.
दरम्यान, कांदा निर्यात होऊ शकत नाही. याबाबत काही अफवा बाजारामध्ये पसरून शेतकऱ्यांना भीती दाखविण्याचं काम सुरू आहे. यावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण केली जात आहे.
याबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले की, विनाकारण शेतकऱ्यांना घाबरून त्यांचे नुकसान करण्यासाठी काही जण अफवा पसरत आहेत शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता टप्प्याटप्प्याने आपला कांदा हा निर्यात करावा, असे आवाहन केले आहे.