Loading
अहमदनगर, 14 ऑगस्ट : शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा खेळाचे ज्ञान आत्मसात करावे जेणेकरून आपल्या आवडीच्या खेळामध्ये करिअर करता येईल.सध्याच्या काळात क्रीडा क्षेत्राला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले असून जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येत असते.धनश्री फंड हिने आपल्या कष्टाच्या जोरावर देश पातळीवर कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव झळकवले आहे.स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जात असतो अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
दिल्ली येथे झालेल्या २० वर्षाखालील राष्ट्रीय निवड चाचणीत नगर जिल्ह्याची कन्या पै.धनश्री हनुमंत फंड हिची ५५ किलो वजन गटातून भारतीय संघात निवड झाली असून स्पेन (युरोप) येथे २ ते ८ सप्टेंबर दरम्यान होणा ऱ्या ज्युनिअर विश्व चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धे मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.तिच्या या पुढील कार्यास अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.यावेळी अध्यक्ष आमदार संग्राम जगताप उपा ध्यक्ष महाराष्ट्र केसरी पै.शिवाजी शिर्के, पै. अर्जुन (देवा) शेळके, पै. शिवाजी चव्हाण, उप महाराष्ट्र केसरी बबन काशीद, महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे, उप महाराष्ट्र केसरी बापू थिटे, सचिव प्रा. डॉ. पै. संतोष भुजबळ, पै. पांडुरंग गुंजाळ, पै. मधुकर उचाळे, पै. रवींद्र वाघ, सह सचिव पै. प्रवीण घुले, पै. शिवाजी कराळे, उत्तर महाराष्ट्र केसरी पै. युवराज करंजुले, पै. उमेश भागानगरे, पै. नितीन काकडे, पै. शंकर खोसे, पै. प्रमोद गोडसे, पै. संदिप कावरे, पै. धनंजय खर्से, पै. अफजल शेख, पै. अतुल कावळे, पै. मोहन गुंजाळ तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अशी माहिती संघटनेचे सचिव प्रा.डॉ.पै.संतोष भुजबळ यांनी दिली.