Loading
अमरावती 29 जुलै शहर वाहतुक शाखा पश्चिम विभागाच्या प्रमुख पीआय रिता उईक आज सोमवार २९ जुलैपासून वाहतुक पोलिसांसह शहरातील ऑटोचालकांची तपासणीची विशेष मोहिम सुरू करणार आहे. या मोहिमेदरम्यान ऑटोचालकांचे परटीम, बॅच, बिल्ला, गणवेश व कागदपत्रांची कसून तपासणी होणार आहे. तसेच नियम तोडणाऱ्या ऑटोचालकांविरोधात ऑन द स्पॉट कारवाई होणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही चौकात अर्धा रस्ता व्यापून ऑटो उभा करणे, ही प्रथा देखील पोलिस कायमची बंद करणार आहे.
शहरात बहुतांश ऑटोचालक मनमानी पध्दतीने बेशिस्त वागतात. चौकात तेही टर्निंगवर अर्धा रस्ता व्यापून प्रवाशांना गोळा करण्यासाठी ऑटो उभा करणे, वाटेत माणून सहजउभादेखील असलातरीमागेपुढे काहीच न पाहता मध्येच ऑटो थांबविणे, गणवेश न घालणे, बिल्ला न लावणे, कुठेही ऑटो पार्क करून मार्गावरील वाहतुक अडविणे, असे सर्रास प्रकार बहुतांश ऑटोवाले करतात. त्यामुळे वाहतुक शाखेच्या प्रमुख पीआय रिटा उईके यांनी आजपासून शहरात ऑटोचालकांच्या तपासणीची विशेष मोहिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पीआय रिटा उईके सोमवार २९ जुलैपासून ताफयासह ऑनरोड होईल शहरातील सर्व ऑटो चालकांचे कागदपत्रे, बिल्ला, परमीट, गणवेश तपासणार आहे. तसेच नियम तोडणाऱ्या ऑटोचालकांवर ऑनदस्पॉट दंडात्मक किंवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई करणार आहे. शाळकरी मुलांची वाहतुक करणाऱ्या ऑटोचालकांची सर्वच बाबतीत कसून तपासणी होणार आहे, हे विशेष. बेवड्या ऑटोचालकांवर वॉच डफरिन, इर्विन, पीडीएमसीसह अमरावती-बडनेरा मार्गावर चालणारे काही ऑटोचालक हे नेहमी दारूच्या नशेत तर्रर्र, असतात. विद्यार्थ्यांना शाळेत सोडल्यानंतर काही ऑटोचालक वॉलकट कपाऊंटसह मुख्य बसस्थानक ते बडनेरा मार्गावर असलेल्या अनेक देशी दारूच्या दुकानात दिसतात. अशा ऑटोचालकांवर देखील वाहतुक पोलिसांना वॉच राहणार असून त्यांच्यावर ड्रंकन ड्राईव्हनुसार कारवाई पोलिस करणार आहे. तसेच त्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव सुध्दा आरटीओ कार्यालयाला पाठविणार आहे.