Loading
अमरावती, १० ऑगस्ट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत १०५ प्रशिक्षणार्थीना कागदपत्र व पडताळणीसाठी महापालिकेत बोलावण्यात आले होते. त्यापैकी ५० लाभार्थी उपस्थित झाले. संमती दर्शवणाऱ्या ३९ प्रशिक्षणार्थी युवक-युवतींना जिल्हाधिकारी तथा प्र. मनपा आयुक्त सौरभ कटियार यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. तसेच शुक्रवार, ९ ऑगस्टला या ३९ युवक- युवतींना रुजू करून घेण्यात आले. युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना रुजू करून घेणारी अमरावती मनपा ही राज्यात पहिलीच आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी योजनेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी असल्याचे त्यांना समजावून सांगितले. या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना सहा महिन्यासाठी ६ हजार, ८ हजार व १० हजार रुपये राज्य शासनाद्वारे विद्यावेतन देण्यात येणार - आहे. ३९ प्रशिक्षणार्थी युवक-युवती - मनपातील विविध विभागात - सहायक म्हणून सेवा देतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा मनपा कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित केला होता. या मेळाव्याला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर व मनपा कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्य निवड झालेले उमेदवार मनपात रुजू झाले आहेत. प्रशिक्षणासाठी नंदकिशोर पवार, शेखर ताकपिठे, विष्णू लांडे, ज्योती पारडशिंगे, अर्चना इंगळे, दिवाकर लकडे यांनी परिश्रम घेतले. मनपाच्या विविध विभागात सहायक म्हणून देतील सेवा मनपा मध्ये प्रशिक्षणासाठी रोहिणी भोरे, प्रिया साहू, धरमवीर युक्नाते, प्रतीक सौदागर, अखिलेश पछेल, हेमंत नागे, ऋषिकेश भडके, प्रणय भडके, अमोल राऊत, करुणा वासनिक, अनामिका तायडे, करिश्मा चौरासे, अमृता सोनेकर, अंजली दोडके, पंकज वैद्य यांच्यासह एकूण ३९ प्रशिक्षणार्थीना रुजू आदेश देण्यात आले आहेत.