Loading
अमरावती 21 ऑगस्ट उन्हाळ्यात बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते. हा त्रास कमी व्हावा यासाठी गावांमध्ये हातपंप, तसेच अन्य स्रोत निर्माण करून आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर घराजवळील हातपंपासह जलस्त्रोतांची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार जलसंचय केला जात आहे. गावांमधील जलस्रोतांची माहिती गोळा केली जात आहे. जिल्ह्यात हजारो जलस्त्रोत आहेत. पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या आणि सिंचनाची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांमधील शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यासाठी शासनाकडून मदत दिली जाते. शासनाकडून प्राप्त आर्थिक मदतीमुळे अनेकजण विहिरी खोदतात. हा विषय शेतीशी संबंधित असला तरी गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या आहेत. सिंचन विहिरीसाठी पाच लाखांचे अनुदान शेतकऱ्यांना दुष्काळासारख्या परिस्थितीशी लढण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतात विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले जाते. बांधकाम विभागाच्या चालू दरसूचीनुसार व केंद्र शासनाकडून प्राप्त वाढीव मजुरी दर विचारात घेऊन सिंचन विहिरीची अनुदान मर्यादा पाच लाख करण्यात आली आहे.