Loading
मुंबई, 17 ऑगस्ट । रंगभूमीवर धुमाकूळ घालत बच्चे कंपनीला घाबरवणारी आणि प्रसंगी हसवणारी ‘चिंची चेटकीण’ गुरुवारी १५ ऑगस्टला श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात तळ ठोकून होती. या चेटकिणीला भेटण्यासाठी छोट्यांसह मोठ्यांनाही तुडुंब गर्दी केली. रत्नाकर मतकरी लिखित तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या 'अलबत्या गलबत्या' नाटकाने सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी अनेक नाट्यरसिकांनी आवर्जून घेतली